Tue, Jul 16, 2019 01:52होमपेज › Sangli › स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू होणार 

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू होणार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पलूस : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळाला यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिली.

लोकनेते  संपतराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित मोफत जिल्हास्तरीय आरोग्य शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख होते.

ना. खोत म्हणाले, गेल्या चाळीस वर्षांत कुंडल प्रादेशिक योजनेसाठी काहीही तरतूद करण्यात आली नव्हती. मात्र आता या योजनेच्या नूतनीकरणासाठी साडेसहा कोटी रुपये मंजूर  केले आहेत.  लवकरच कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.पलूसचा पाणीप्रश्‍न गंभीर आहे. मात्र नगरपरिषदेकडून  नवी योजना किंवा मदतीसाठी  प्रस्तावच आलेला नाही. तसा प्रस्ताव आला तर स्वतंत्र योजना मंजूर  करू.

जिल्हा आरोग्य अधिकारी राम हंकारे यांनी स्वागत केले. आरोग्य सभापती तम्मनगौडा रवि पाटील यांनी प्रास्ताविक केले.  अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी पलूस तालुक्याचे भाग्यविधाते क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या नावाने आरोग्य योजना सुरू करीत असल्याची घोषणा केली.

यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी मनोगत व्यक्‍त करीत  सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांचा उपयोग होत असल्याची माहिती दिली.

जि.प. चे उपाध्यक्ष सुहास बाबर, गटनेते शरद लाड, सदस्य सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले, अश्‍विनी पाटील, सुषमा नायकवडी, सभापती सीमा मांगलेकर, प्रांताधिताकी विजय देशमुख, तहसीलदार राजेंद्र पोळ   उपस्थित होते.  विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. गटविकास अधिकारी संजय चिल्‍लाळ यांनी आभार मानले.

Tags : recommendations, Swaminathan, Commission, applicable, Sathabhau Khot, sangli news


  •