होमपेज › Sangli › हिंसाचाराच्या मागे सत्ता पिपासू लोकांची कौरव बुद्धी: संभाजी भिडे

हिंसाचाराच्या मागे सत्ता पिपासू लोकांची कौरव बुद्धी: संभाजी भिडे

Published On: Jan 05 2018 2:33PM | Last Updated: Jan 05 2018 2:33PM

बुकमार्क करा
सांगली : पुढारी ऑनलाईन

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आज, माध्यमांशी संवाद साधला. या प्रकरणी कोणत्याही चौकशीला समोरे जाण्यास तयार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करावा आणि दोषींवर कठोरातील कठोर देहांत शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीही चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. 

भिडे गुरुजी म्हणाले, 'मी भीमा कोरेगावला गेलो नाही. माझे तेथे कोणतेही भाषण झाले नाही. मग, मी या हिंसाचाराचा दोषी कसा? हे म्हणजे न जन्मलेल्या बाळाच्या बारशाची तयारी करण्यासारखे आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होण्याची गरज आहे. वडू बुद्रुक येथे संभाजी भिडे यांचे भाषण होणार अशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर झाली होती. ती कोणी शेअर केली? याचा तपास झाला पाहिजे.'

महाभारतात भगवान श्रीकृष्णावरही चोरीचा आरोप झाला होता. तो नंतर खोटा ठरला. आता त्याची पुनरावृत्ती होत आहे, असे मत भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, 'हातातील सत्ता गेल्यामुळे अनेकजण अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी सुरुवातीला संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन पेटवले. ज्यांचे ट्रक भरून ऊस कारखान्याला जातात. त्या नेत्यांना अचानक शेतकऱ्यांचा कळवळा आला. त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाले. इतरांना आहे, त्याप्रमाणे त्यांनाही आरक्षण द्यावे या मताचा मी आहे. आता लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा द्यावा, यासाठी आंदोलन केले जात आहे.' या सगळ्यामागे सत्ता पिपासू लोकांची कौरव बुद्धी आहे. पण, यात पांडवच जिंकतील आणि लोकशाहीचा विजय होईल, असे मत भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले. 

संबंधित बातम्या:

कराड : भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर(व्हिडिओ)

खासदार उदयनराजे,संभांजी भिंडेंच्या पाठिशी