Thu, Jul 18, 2019 04:46होमपेज › Sangli › शेट्टींचा खोटे बोलण्यात हातखंडा : सदाभाऊ खोत 

शेट्टींचा खोटे बोलण्यात हातखंडा : सदाभाऊ खोत 

Published On: Feb 26 2018 7:11PM | Last Updated: Feb 26 2018 7:17PMइस्लामपूर : वार्ताहर

'खासदार शेट्टींचा खोटे बोलण्यात हातखंडा आहे. ते साफ खोटे बोलतात. गेली ८ वर्षे ते दोन सरकारी शस्त्रधारी गार्ड घेऊन फिरत आहेत आणि सांगतात की, मला संरक्षणाची गरज काय, मग हे संरक्षण नव्हे तर काय? तुमच्यात जरा जरी पावित्र्य असेल तर आता राजकारण सोडा!' असा पलटवार मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्या आजच्या वक्तव्यावर केला.

माझ्या मतदार संघात कोणाचे संरक्षण घेऊन फिरायची मला गरजच काय? ज्या दिवशी अशी वेळ येईल त्या दिवशी मी निवडणूक लढवायचे बंद करेन असे खासदार राजू शेट्टी इस्लामपूर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. त्याला सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले.

दै. पुढारीशी बोलताना ना. खोत म्हणाले, शेट्टींच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे. पराभव समोर दिसू लागल्याने ते काहीही बरळत चालले आहेत व खासदारकी वाचविण्यासाठी कारखानदारांच्या गळ्यात गळे घालत आहेत. 

ते म्हणतात मी कोणाचे संरक्षण घेऊन फिरत नाही. हे साफ चुकीचे आहे. कारण गेली ८ वर्षे ते खासदार आहेत. तेंव्हापासून त्यांना सरकारी संरक्षण आहे, दोन शस्त्रधारी शरीर रक्षक नेहमी त्यांच्यासोबत असतात. हे संरक्षण नव्हे तर काय? मला तर मंत्री झाल्यावरच संरक्षण मिळालेय. आता त्यांचा खोटारडे पणा सिध्द झालाय त्यामुळे त्यांनी राजकारण सोडावे.

वाचा राजू शेट्टी काय म्हणाले होते- ...तर मी निवडणूक लढवायचे बंद करेन : राजू शेट्टी