Thu, Apr 25, 2019 07:49होमपेज › Sangli › राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवारांना ३ महिन्याचा कारावास 

राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवारांना ३ महिन्याचा कारावास 

Published On: Mar 23 2018 6:48PM | Last Updated: Mar 23 2018 6:48PMइस्लामपूर: वार्ताहर

कारंदवाडी (ता.वाळवा) येथील सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरुन राजारामबापू कारखाना आणि आमदार जयंत पाटील यांची मानहाणी केल्या प्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांना न्यायालयाने ३ महिन्याची शिक्षा सुनावली. तसेच २०००० रु. दंडही ठोठावला.  

२०१२ मध्ये पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन कारखान्याच्या मालकी हक्कावरुन सुरु असलेल्या वादातुन आमदार पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राजारामबापू कारखान्याने न्यायालयात पवार यांच्याविरोधात खासगी याचिका (प्रायव्हेट केस) दाखल केली होती. आज या केसचा निकाल लागला. न्यायालयाने पवार यांना ३ महिने सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  तसेच त्यांना अपिल करण्यासाठी १५ दिवसांची मुदतही न्यायालयाने दिली आहे. पवार हे माजी आमदार संभाजी पवार यांचे चिरंजीव आहेत.
 

 

Tags : sangli, sangli news, islampur, rajarambapu sugar factory, president pruthviraj pawar,  defamation case, pruthviraj pawar guilty, MLA jayant patil,three month jail