होमपेज › Sangli › राजारामबापू कारखान्याचे वजनकाटे तंतोतंत 

राजारामबापू कारखान्याचे वजनकाटे तंतोतंत 

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 13 2018 11:02PM

बुकमार्क करा
इस्लामपूर : प्रतिनिधी

शासनाच्या भरारी पथकाने राजारामबापू साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरूल शाखा व कारंदवाडी युनिट कार्यस्थळावरील वजनकाट्यांची तपासणी केली. यामध्ये कोणताही दोष आढळलेला नाही. तिन्ही युनिटचे वजनकाटे तंतोतंत आहेत, अशी माहिती देण्यात आली. 

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्या सुचनेवरून प्रशासनाने जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजारामबापू कारखान्याच्या तीनही युनिटचे वजनकाटे तपासण्यात आले. 

वाळव्याचे तहसीलदार नागेश पाटील, वैधमापन शास्त्र विभागाचे  निरीक्षक डी.एस. राजमाने, विशेष लेखा परीक्षक  डी. एस.  खांडेकर, विशेष लेख परीक्षक  एस. एस. चौथे आणि पोलिस अधिकारी यांचा या पथकामध्ये समावेश होता. या पथकाने प्रथम उसाच्या वाहनांचे प्रत्येक वजनकाट्यांवरून वजन केले. त्यानंतर मोकळ्या वाहनांचे वजनही केले. तसेच 20 किलोच्या 300 वजनांनी प्रत्येक काट्याचे वजन तपासले. सर्व तपासण्या बिनचूक आल्या आहेत. कारखान्याचे सचिव प्रतापराव पाटील, जनरल मॅनेंजर एस. डी.कोरडे, चीफ इंजिनिअर विजय मोरे, शेती अधिकारी प्रशांत पाटील, चिफ अकौटंट अमोल 
पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.