Mon, Jun 17, 2019 00:11होमपेज › Sangli › जांभुळवाडीत जुगार अड्ड्यावर छापा

जांभुळवाडीत जुगार अड्ड्यावर छापा

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 11:47PM

बुकमार्क करा

इस्लामपूर : वार्ताहर

जांभुळवाडी (ता. वाळवा) येथील बंद पडलेल्या प्लायवूड कारखान्याच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून  तीन पानी जुगार खेळणार्‍या आठजणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी 41 हजार रुपयांच्या रोख रकमेसह पाच मोटारसायकल, 10 मोबाईल असा अंदाजे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

दीपक बाळकृष्ण लाहिगडे  (वय 32), गणेश अर्जुन माने (वय 31, दोघे रा. कासेगाव), रामेश्‍वर बाळासाहेब बेंद्रे, पिंटू वसंत पवार (वय 36), संजय शिवाजी शिंदे (वय 44, रा. पेठ), सचिन जनार्दन कदम (वय 42, रा. मुंबई), श्रीकांत बाबुराव गवळी (वय 42), रविराज शामराव पाटील (वय 29, रा. इस्लामपूर) अशी पथकाने ताब्यात घेतलेल्या आठजणांची नावे 
आहेत. 

प्लायवूड फॅक्टरीच्या मागे संजय शिंदे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्यांचा तीनपानी जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस उपअधीक्षक किशोर काळे यांनी पथकासह तेथे छाप टाकला. या छाप्यात रोख रक्कम, मोटारसायकल असा 1 लाख 55 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल सापडला.