Wed, Sep 19, 2018 16:21होमपेज › Sangli › बनावट दारू कारखान्यावर छापा 

बनावट दारू कारखान्यावर छापा 

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 23 2018 11:25PMपलूस : प्रतिनिधी   

पलूस तालुक्यातील  रामानंदनगर  येथे टँगोपंच आणि देशी संत्रा या नावाने बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी मंगळवारी दुपारी उघडकीस आणला. तेथे सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल, दारूच्या बाटल्यांचे 32 बॉक्स, दोन पोती रिकाम्या बाटल्या, सीलपंच मशिन आणि गाडी असा ऐवज जप्‍त केला आहे.

ही कारवाई पलूस पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी केली.रामानंदनगर येथील विक्रम सुरेश मदने हा त्याच्या घराच्या बाजूला असणार्‍या पडीक जागेमध्ये हा कारखाना चालवत होता. देशी दारू आणून त्यात केमिकल मिक्स करून रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून ती दारू विक्रीसाठी तालुक्यात व जिल्ह्यात पाठवत  असे. बनावट दारू असलेल्या त्या बाटल्यांचे बूच सील करण्यासाठी तो सीलपंच करण्याची मशिनही वापरत असे. 

या बनावट दारुमुळे मद्यपींच्या  आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. या बनावट दारूच्या कारखान्याची पोलिसांच्या गुप्‍तवार्ता विभागामार्फत माहिती मिळताच या  कारखान्यावर छापा टाकण्यात आला.  मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या कारवाईत  उपनिरीक्षक मोहिते, सुरेंद्र धुमाळे, अविनाश लोहार, सचिन चव्हाण, अमोल कदम, शंकर कुटे, सुधीर शिंदे, आय्याज शेख यांनी भाग घेतला.