Wed, May 22, 2019 20:18होमपेज › Sangli › सांगलीत मटका अड्ड्यावर छापा

सांगलीत मटका अड्ड्यावर छापा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील बदाम चौक परिसरातील मटका अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी दोन बुकिंसह आठजणांना अटक केली. यावेळी मोटारसायकल, मोबाईल, मटक्याचे साहित्य असा 3 लाख 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष पोलिस पथकाने शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही कारवाई केली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

बुकी मालक शोएब सलीम पटेल (वय 29), बुकी मालक सद्दाम सलीम पटेल (वय 27), जांबाज आलम शेख (वय 23), आशपाक गुलफाम बेग (वय 21), शकील मलंग मकानदार (वय 23), सुहेल उस्मान शेख (वय 22), रफीक जैनुद्दीन शेख (वय 42), शाहबाज आलम शेख (वय 21, सर्व रा. बदाम चौक, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना मटक्याची मिळाल्यानंतर त्यांनी विशेष पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पथकाने दुपारी पटेल यांच्या घरी छापा टाकला. त्यांच्याकडून दोन मोटारसायकल, 13 मोबाईल, 8 कॅल्क्युलेटर, एक लॅपटॉप, मटक्याचे साहित्य, 57 हजार 30 रुपये रोख असा 3 लाख 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

Tags : Matta Station, raid, sangli, sangli news,


  •