Mon, May 20, 2019 18:06होमपेज › Sangli › सांगली : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा

सांगली : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

येथील विजयनगरमधील श्रीरामनगरमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. त्या ठिकाणी असलेली एक अल्पवयीन मुलगी आणि एका महिलेची सुटका केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या पथकाने ही कारवाई केली. विश्रामबाग पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी सहाजणांना अटक केली आहे. पूजा ऊर्फ सविता मनोज बोईन (वय 40, रा. योगीराज बंगला, श्रीरामनगर), सुनील यशवंत पुकळे (वय 30), उमेश रवी कांबळे (वय 21), विशाल संजय सावंत (वय 19, रा. सर्व   भारत सूतगिरणी, कुपवाड), नारायण धोंडीराम कुंभार (वय 31) व अभिजीत रघुनाथ कुंभार(वय 30, रा. दोघेही नांगोळे, ता. कवठेमहांकाळ) यांचा त्यात समावेश आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : बोईन यांच्या योगीराज बंगल्यामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आज छापा टाकला. त्यातून एका अल्पवयीन मुलीसह एका महिलेची सुटका करण्यात आली. या रॅकेटमध्ये सहभागी झालेल्या सहाजणांना अटक करण्यात आली. 

पोलिस उपनिरीक्षक शिल्पा यमगेकर, भगवान नाडगे, विकास पाटणकर, लता गावडे, कविता पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.  संशयित आरोपींविरोधात अनैतिक मानवी व्यापार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार  गुन्हे दाखल केले आहेत.