Sun, Jul 21, 2019 08:07होमपेज › Sangli › सांगलीत पिसाळलेल्या कुत्र्याकडून पाच जणांवर हल्‍ला

सांगलीत पिसाळलेल्या कुत्र्याकडून पाच जणांवर हल्‍ला

Published On: May 17 2018 2:33PM | Last Updated: May 17 2018 2:33PM सांगली  : प्रतिनिधी

सांगलीत महापालिकेसमोर गुरुवारी पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. या कुत्र्याने पाच जणांचा चावा घेतला. शहर पोलीस स्टेशन आवारात हा प्रकार घडला. कुत्र्याला पकडण्यासाठी डॉग व्हॅन दाखल झाली. पथकाने कुत्र्याला ताब्यात घेतले. 

सांगली, मिरज आणी कुपवाडमध्ये भटक्या कुत्र्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. प्रत्येक चौकात कुत्र्यांचे कळप असतात. यापूर्वी कुत्र्यांनी अनेक जणांवर हल्ला केला होता. काही लहान मुलांचे लचकेसुद्धा तोडले आहेत. मात्र महापालिका या कुत्र्याचा बंदोबस्त करत नाही. अशा घटना घडल्या की कुत्री पकडून परत दुसरीकडे सोडण्यात येतात.

आज सांगली शहर पोलीस स्टेशनसमोर आज एका पिसाळलेल्या कुत्र्यांनी ५ ते ६ जणांवर हल्ला केला. रस्त्यावरून महाविद्यालयीन मुली जात होत्या. त्यांना कुत्र्याने चावा घेतला. दोन वृद्ध महिला आणि नागरिक जात होते. त्यांचाही चावा घेतला. हा सर्व प्रकार रस गाडीवाल्याने पहिला आणि महापालिकेला कळविले. महापालिकेच्या डॉग व्हॅनकडून कुत्र्याला ताब्यात घेण्यात आले असून जखमी नागरिकांवर उपचार सुरू आहेत.