Thu, Jul 18, 2019 06:45होमपेज › Sangli › सांगलीत कस्तुरी क्लबतर्फे भव्य मोटारसायकल रॅली

सांगलीत कस्तुरी क्लबतर्फे भव्य मोटारसायकल रॅली

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 10 2018 12:17AMसांगली : प्रतिनिधी

महाराष्ट्रीय नऊवारी साडी, डोक्यावर फेटा, नाकात नथ, डोळ्यावर स्टाईलिश गॉगल अन् मर्दानी थाटात मोटारसायकलवर स्वार होऊन ‘हम भी कुछ कम नही’ असे म्हणत महिलांनी शहरात रॅली काढली. रॅलीमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 

जागतिक महिला दिनानिमित्त दै. पुढारीच्या ‘कस्तुरी क्लब’ व ‘आपलं एफएम’ तसेच रशिदाबी अजिज  शेख, श्री. अशोक पाटील व विज्ञान माने, गणेश पवार यांच्यावतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी जिल्हा परिषदेसमोरून रॅलीला सुरुवात झाली.  यावेळी नगरसेविका सौ. पद्मिनी जाधव, रशिदाबी शेख, अर्चना सुतार, वर्षा लठ्ठे, सुनीता लालवाणी, कांचन भांडवले, अश्‍विनी देसाई, अश्‍विनी देशपांडे, आशा पवार, पद्मिनी पवार आदींच्याहस्ते रॅलीचे उद्घाटन झाले.

जिल्हा परिषदेसमोर विश्‍वकर्मा रणरागिणी ढोल पथकाकडून महिलांनी ढोल ताशांचा गजर करून रॅलीला सलामी दिली. त्यानंतर रॅलीला उत्साहात सुरुवात केली. 
जिल्हा परिषद, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, राममंदिर, काँग्रेस भवनमार्गे राजवाडा चौकातून महापालिका कार्यालय चौक, तरुण भारत व्यायाम मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मारुती रोड, बसस्थानक, झुलेलाल चौक, आंबेडकर रोडहून येऊन रॅलीचा समारोप पुढारी भवन येथे समारोप करण्यात आला. त्यानंतर उपस्थित महिलांनी मनोगत व्यक्त केले. कस्तुरी क्लबने महिलादिनी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केल्याबद्दल  महिलांनी धन्यवाद दिले.

महिलांसाठी स्पॉट गेम
मोटारसायकल रॅली झाल्यानंतर इमॅन्युअल स्कूलच्या क्रीडांगणावर कस्तुरी क्लबच्या सभासदांसाठी विविध स्पॉट गेम घेण्यात आले. तसेच उपस्थित प्रत्येक महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. 

मोटारसायकलवर फेटेधारी महिला
कस्तुरी क्लबच्यावतीने मोटारसायकल रॅली निघाली. अनेक महिलांनी मोटारसायकली चालवणे पसंत केले. त्यामुळे शहरातील रस्त्यावर रॅलीत मोटारसायकल चालवणार्‍या  फेटेधारी महिला दिसत होत्या. महिला दिनाला रॅलीमधून ही वाहने चालविण्याची इच्छा महिलांनी पूर्ण केल्याचे अनेकांनी सांगितले.