Fri, Apr 26, 2019 17:21होमपेज › Sangli › दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित हळदी-कुंकूला प्रतिसाद

दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित हळदी-कुंकूला प्रतिसाद

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 19 2018 9:02PMसांगली  : प्रतिनिधी 

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब, आपलं एफएम आणि चंदुकाका सराफ यांच्या वतीने  महिलांसाठी मकर संक्रांतीनिमित्त आयोजित ‘आपल्या कस्तुरींसाठी आपलं हळदी-कुंकू’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला. हळदी-कुंकू हा सर्वच महिलांचा जिव्हाळ्याचा  विषय. हा जिव्हाळा जपण्यासाठी चंदुकाका सराफ यांच्या शोरुममध्ये ‘आपल्या कस्तुरींसाठी आपलं हळदी-कुंकू’ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात कस्तुरी सभासदांना हळदी-कुंकवाचे वाण देण्यात आले. तसेच कस्तुरींच्यासाठी विविध स्पॉटगेम स्पर्धा घेण्यात  आल्या. 

चंदुकाका सराफ यांच्याकडून यावेळी लकी ड्रॉ घेण्यात आला यामध्ये गावभाग सांगली येथील सुषमा पुरुषोत्तम कुडाळकर या लकी ड्रॉ विनर ठरल्या. यावेळी कस्तुरींना बक्षिसांची लयलूट करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी कस्तुरी सभासद नोंदणीही सुरू होती. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला.  कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी 500 रुपये आहे. सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार  आहे. सभासद महिलांना वर्षभर तसेच विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस मिळणार  आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत   आहे.