Fri, May 24, 2019 06:26होमपेज › Sangli › तडका, चवीबरोबरच नामवंत सेलिब्रेटींज्चा!

तडका, चवीबरोबरच नामवंत सेलिब्रेटींज्चा!

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:19PMसांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब नेहमीच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यरत असते. वेगवेगळे मनोरंजनात्मक कार्यक्रम देऊन त्यांचे मनोरंजन करत असते. येत्या 4 मे ते 6 मे पर्यंत दै. पुढारी कस्तुरी क्‍लबने सभासद तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी कस्तुरी खाद्य खरेदी धमाल या भव्य फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य प्रायोजक म्हणून प्रतिराज युथ फौंडेशन आणि सहप्रायोजक म्हणून शाल्वी एंटरप्रायजेस हे लाभले आहेत.

‘पुढारी कस्तुरी क्‍लब’ आणि प्रतिराज यूथ फौंडेशन आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल. या ठिकाणी मनसोक्‍त खरेदीबरोबरच लज्जतदार पदार्थांवर ताव मारता येणार आहे. हे फेस्टीव्हल शुक्रवार दि. 4 मे पासून 6 मे पर्यंत इस्लामपूरमधील जयंत पाटील खुले नाट्यगृहमध्ये सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत खुले राहणार आहे. हे फेस्टीव्हल सर्वांसाठी खुले असणार आहे.

या फेस्टिव्हलमध्ये व्हेज, नॉनव्हेज असो, स्नॅक असो वा जेवण. खाण्यावर प्रेम करणार्‍यांना प्रत्येक पदार्थाची चव चाखून बघायला नक्‍कीच आवडते. त्यामुळे मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थांची येथे असंख्य पदार्थ असणार आहेत. मांसाहारी पदार्थांमध्ये बिर्याणी, वडा, कोंबडा, चिकण, बिर्याणी, कबाब, चिकन, लॉलीपॉप, तंदूर, चिकन 65, मटण ताट, खिमा, फिश, मंच्युरियन तर शाकाहारीमध्ये पिझ्झा, ब्रर्गर,  डोसा, उताप्पा, गोबी मंच्युरियन, भेल, पाणीपुरी, सँडविच, पप्स, चीज, झुणका भाकर, व्हेज, पुलाव, सोलकढी, आईस्क्रीम आदी पदार्थ असणार आहेत. मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थांची स्वतंत्र विभाग असणार आहेत.

सोबत मनसोक्‍त खरेदीसाठी गृहउपयोगी वस्तूंची भरपूर व्हरायटी आणि नाविन्यपूर्ण प्रॉडक्टस् असणार आहेत. फेस्टिव्हलच्या स्टॉल बुकिंगसाठी 8805023883, 8805024242 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा.

Tags : sangli, sangli news, pudhari kasturi Club, Organizing, grand festival,