Tue, Mar 26, 2019 21:54होमपेज › Sangli › शॉपिंग फूड फेस्टिव्हलची तयारी अंतिम टप्प्यात

शॉपिंग फूड फेस्टिव्हलची तयारी अंतिम टप्प्यात

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 02 2018 11:38PMसांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्लब आणि प्रतिराज युथ फौंडेशन आयोजित शॉपिंग अ‍ॅण्ड फुड फेस्टीव्हल हे फेस्टिव्हल उद्यापासून सुरू होत आहे.  या फेस्टिव्हलची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. या फेस्टीव्हलमध्ये लज्जतदार, चमचमीत पदार्थांची चव चाखण्याबरोबरच विविध वस्तूंच्या शॉपिंगचा आनंद लुटता येणार आहे. दैनंदिन गरजांपासून स्वयंपाक घरातील विविध उपयोगी साहित्य खरेदी करण्याची पर्वणी एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे...

या फेस्टिव्हलसाठी मुख्य प्रायोजक प्रतिराज युथ फौंडेशन आणि सहप्रायोजक शाल्वी एंटरप्रायजेस तसेच जय हनुमान पतसंस्था, रिओ वॉटर टँक आणि झी मराठी यांची विशेष सहकार्य लाभले आहे.
हा फेस्टिव्हल शुक्रवार (दि.4) मे पासून 6 मेपर्यंत इस्लामपूरमधील जयंत पाटील खुले नाट्यगृहमध्ये सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत खुले राहणार आहे. हा फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला असणार आहे.
कलाकारांचा जल्लोष
या फेस्टिव्हलमध्ये 4 ते 6 मे दरम्यान दररोज सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शुक्रवार (दि. 4 मे).  झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ फेम अजिंक्य आणि शितल यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. तसेच ‘ई टीव्ही’वरील ‘दादांचा वारसदार’ विजेते नितीन कुलकर्णी आणि सिनेअभिनेत्री मंजुषा खेत्री यांचा हसतमुखी-सदामुखी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

शनिवारी (दि. 5 मे) ‘झी मराठी’वरील ‘संभाजी’ फेम संभाजी (डॉ. अमोल कोल्हे), पुतळाबाई  (पल्लवी वैद्य) यांची थेट मुलाखत  ‘अस्मिता’फेम अस्मिता (मयुरी वाघ) या घेणार आहेत. त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गायक प्रल्हाद  पाटील यांचा प्रल्हाद विक्रम प्रस्तुत ऑर्केस्ट्रा रॉकिंग हीटस् हा कार्यक्रम असणार आहे. रविवार (दि. 6 मे) ‘मिस् कस्तुरी इस्लामपूर’ आणि ‘मिसेस कस्तुरी इस्लामपूर’ या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. 

खाद्यपदार्थांची मेजवानी

मांसाहारी, शाकाहारी पदार्थांची रेलचेल प्रदर्शनात असणार आहे. मांसाहारीमध्ये बिर्याणी, वडा, कोंबडा, चिकण, बिर्याणी, कबाब, चिकन, लॉलीपॉप, तंदूर, चिकन 65, मटण ताट, खिमा, फिश, मंच्युरियन तर शाकाहारीमध्ये पिझ्झा, ब्रर्गर,  डोसा, उताप्पा, गोबी मंच्युरियन, भेल, पाणीपुरी, सँडविच, पप्स, चीज, झुणका भाकर, व्हेज, पुलाव, सोलकढी, आईस्क्रिम आदी पदार्थ असणार आहेत.
फेस्टीव्हलमधील फूड स्टॉल बुकिंगसाठी आणि स्पर्धेसाठी  8805023883, 8805024242 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा.