Tue, Mar 26, 2019 22:12होमपेज › Sangli › पुढारी ग्रामीण प्रीमिअर लीग स्पर्धा शुक्रवारपासून

पुढारी ग्रामीण प्रीमिअर लीग स्पर्धा शुक्रवारपासून

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 10:28PMसांगली : प्रतिनिधी

पुढारी ग्रामीण क्रिकेट प्रीमिअर लीग स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. दि. 25 मेपासून छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा मंगळवारी (दि.22) लिलाव होणार असल्याची माहिती सचिव विज्ञान माने यांनी दिली.

ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘पुढारी’तर्फे गेल्या सात वर्षांपासून या स्पर्धा भरविण्यात येत आहेत. या माध्यमातून अनेक खेळाडूंना संधी मिळाली आहे. यावर्षीही या स्पर्धा 25 पासून सांगलीत सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात खेळाडूंची निवड चाचणी पार पडली आहे. आता या खेळाडूंचा दि. 22 मेरोजी लिलाव होणार आहे. त्यासाठी खेळाडूंनी संघमालकांशी संपर्क साधावा.

या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रीमिअर लीगची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष सुहास बाबर, कार्याध्यक्ष सम्राट महाडिक, सचिव विज्ञान माने, संचालक पृथ्वीराज पवार, आदिनाथ मगदूम, रणजित सावर्डेकर, जयंत टिकेकर, सुधीर सिंहासने, ज्येष्ठ प्रशिक्षक अनिल जोब, संदीप औताडे, राकेश उबाळे, योगेश पवार, उदय पाटील, दिनेश उबाळे, प्रशांत जाधव, हर्षद माने, धनेश कातगडे तसेच स्पर्धेचे आधारस्तंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले आहे.