सांगली : प्रतिनिधी
दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबतर्फे अंकली येथे आयोजित ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी हसतखेळत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. अंकलीच्या जयश्री हावले, सुप्रिया कुंभार, तेजाली खवाटे, माया यादव या होम मिनिस्टरच्या विजेत्या ठरल्या. इतर अनेक महिलांना विविध बक्षिसे मिळाली.
टोमॅटो एफएमवरील बाबुराव यांनी महिलांशी संवाद साधला. अनेक गंमती जंमती, जोक सांगून तसेच एफएमवरून केलेले कॉल व त्याला मिळणारा प्रतिसाद याचीही गंमतीशीर माहिती सांगितली. या कार्यक्रमात अंकली व परिसरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सभासद नोंदणी केली. विजेत्या ठरलेल्या चार ‘होम मिनिस्टर’ ना ‘दडगे बंधू’ यांच्याकडून डिझायनर साड्या देण्यात आल्या. जयश्री हावले, सुप्रिया कुंभार, तेजाली खवाटे, माया यादव या महिला डिझायनर साडीच्या मानकरी ठरल्या.
याबरोबरच व्हीएलसीसी यांच्याकडून अनुक्रमे शिल्पा कोलप, राणी पाटील, सविता आरकेरी, वैशाली सूर्यवंशी माधुरी परीट या विजेत्या महिलांना 500 रुपयांचे सर्व्हिस कूपन देण्यात आले. तसेच विद्या यादव, पूजा संकपाळ, नेहा कुंभार व इतर महिला कस्तुरी क्लबच्या सभासद झाल्याबद्दल ‘महालक्ष्मी आटा चक्की’ यांच्याकडून 25 डिस्काऊंट कूपन यावेळी देण्यात आली. संयोजनासाठी गावातील महिला बचत गटांनी मदत केली. कार्यक्रमासाठी सौ. गीतांजली उपाध्ये, सौ. संजीवनी पाटील, श्रुती सावळवाडे, दीपा मगदूम यांचे सहकार्य लाभले.