Mon, May 27, 2019 07:25होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लब, आपलं एफएम व चंदुकाका सराफ यांच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रम

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब, आपलं एफएम व चंदुकाका सराफ यांच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रम

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 14 2018 8:15PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी 

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब महिलांसाठी नेहमीच नवीन उपक्रम घेऊन येत असतात. दि. 16 जानेवारीरोजी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब, आपलं एफएम व चंदुकाका सराफ यांच्या विद्यमाने  ‘आपल्या कस्तुरींसाठी आपलं हळदी-कुंकू’ चे आयोजन करण्यात आले आहे. 

दि. 16 जानेवारीरोजी दु. 4 वाजता चंदुकाका सराफ यांच्या शोरुममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात कस्तुरी सभासदांना हळदी-कुंकूवाचे वाण दिले जाणार आहेत. विविध स्पॉटगेम घेण्यात येणार आहेत. यावेळी बक्षिसांची लयलूट करण्याची संधी मिळणार आहे. याचे प्रायोजक मे. चंदुकाका सराफ आहेत. चंदुकाका सराफ यांच्याकडे पायल महोत्सव सुरू आहे. याचाही लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी कस्तुरी सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. 

कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी 500 रुपये आहे. सभासद झाल्यानंतर नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार आहे. सभासदांना  वर्षभर, विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस मिळणार आहेत.