Fri, Jul 19, 2019 22:33होमपेज › Sangli › दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे सांगली, मिरजेमध्ये ‘झुंबा वर्कशॉप’

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे सांगली, मिरजेमध्ये ‘झुंबा वर्कशॉप’

Published On: Jan 02 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 12:00AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी 

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब खास कस्तुरी मेंबरसाठी झुंबा वर्कशॉप घेऊन येत आहे. दि. 1 ते 5 जानेवारी या नवीन वर्षांत एक नवीन संकल्प घेऊन महिलांसाठी ही संधी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब व प्रदीप सातपुते फिटनेस अ‍ॅकॅडमी, मिरज देत आहेत.  

प्रदीप सातपुते  फिटनेस अ‍ॅकॅडमी ही गेली पाच वर्षे मिरज येथे  कार्यरत आहे.  दि. 1 जानेवारी मिरज येथे वर्कशॉप सुरु झाले आहे. ते पाच जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.  दि. 6  ते 11 जानेवारीस  सांगली येथे  झुंबा वर्कशॉप होणार आहे.  हे वर्कशॉप सध्या सुरू आहे. या  झुंबा वर्कशॉपसाठी मिरज शहरातील महिला नाव नोंदवू शकतात. कस्तुरी क्‍लबच्या सभासद नोंदणी करू शकतात. 

झुंबा वर्कशॉपसाठी कस्तुरी महिलांना  मोफत प्रवेश  राहील.  इतर महिलांना  200 रूपये प्रवेश फी आहे.   तसेच लगेच मेंबर होऊ इच्छिणार्‍यांनाही मोफत प्रवेश राहील. महिला कस्तुरी सभासद नोंदणी कार्यक्रमाच्या ठिकाणी करू शकतात. झुंबा वर्कशॉपसाठी पत्ता  मिरज ः प्रदीप सातुपते, फिटनेस अ‍ॅकॅडमी बाळकृष्ण कॉम्प्लेक्स, तिसरा मजला,  शिवाजीनगर रोड,  मिरज.  सांगली  : वृत्तपत्र विक्रेता भवन, त्रिकोणी बागेजवळ . यावेळी कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी 500 रुपये आहे. सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार आहे. सभासद महिलांना वर्षभर तसेच विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस मिळणार आहेत.  याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.