Sun, May 26, 2019 17:20होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लब यांच्यावतीने महिलांसाठी ‘योगासन’ वर्कशॉप

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब यांच्यावतीने महिलांसाठी ‘योगासन’ वर्कशॉप

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 17 2018 10:22PMसांगली : प्रतिनिधी 

दै. ‘पुढारी कस्तुरी क्‍लब’ व ‘स्पेक्ट्रा जिम’ यांच्यावतीने महिलांसाठी ‘योगासन’ वर्कशॉप घेण्याचे आयोजन केले आहे. 21 मार्च  ते 25 मार्च असे पाच दिवस हे वर्कशॉप घेण्यात येणार आहे. हा वर्कशॉप वृत्तपत्रविक्रेता भवन, त्रिकोणी बागेजवळ, सांगली  येथे रोज दुपारी 3.30 ते 4.30 पर्यंत होणार आहे. 

वर्कशॉपमध्ये महिलांना योगासनाचे महत्व,  मेडिटेशन, शास्त्रोक्त पध्दतीने सूर्यनमस्कार व प्राणायाम कसे करावे याची माहिती महिलांना देण्यात येणार आहे. धकाधकीच्या व धावत्या जगात महिलांना स्वत:साठी वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे शुगर, ब्लडप्रेशर, थॉयराईड, अस्थमा, वेटलॉस असे अनेक आजार व विकार सुरू होतात.  

त्यासाठी महिलांना आरोग्यविषयक तसेच योगासनाचे फायदे यांची माहिती योगशिक्षिका रोहिणी  भोसले  या  देणार आहेत.  रोहिणी भोसले या योगविद्याधाम नाशिक विद्यापीठाच्या श्रेष्ठतर श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्यांनी शुगर ब्लडप्रेशर, थॉयराईड, आस्थमा, वेटलॉस अशा अनेक आजारांवर यशस्वीरित्या योगाद्वारे उपचार करण्यात यश मिळवले आहे. या वर्कशापचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन कस्तुरी क्‍लब सांगलीतर्फे करण्यात आले आहे .  योगासन वर्कशॉपसाठी कस्तुरी क्‍लब सभासदांना  मोफत प्रवेश  राहील तसेच  इतर महिलांना  100 रुपये प्रवेश फी राहणार आहे. 

Tags : pudhari, Kasturi Club, Yogasan, workshop, women,