Wed, Jan 23, 2019 08:35होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे आज ‘होम मिनीस्टर’

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे आज ‘होम मिनीस्टर’

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 12 2018 8:56PMइस्लामपूर : वार्ताहर

जागतिक महिला दिनानिमित्त दै. पुढारी कस्तुरी क्‍लब व सॅटर्डे क्‍लब यांच्या विद्यमाने मंगळवार, दि. 13 मार्चरोजी दु. 3 वाजता ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सभासद महिलांना यात मनोरंजनाबरोबरच बक्षिसांची लयलूट करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 

फनी गेम्स, महिलांशी संवाद, गाण्यांची फर्माइश आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. टोमॅटो एफ. एम. चे बाबुराव व बोलबच्चन महिलांशी संवाद साधून मनोरंजन करणार आहेत. गायक उमेश जंगम व त्यांचे सहकारी हिंदी, मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. ताकारी येथील पायल साडी सेंटरचे संजय शहा यांच्याकडून होम मिनिस्टरची पैठणी भेट मिळणार आहे. 

येथील हनुमाननगर, नालबंद कॉलनी येथील सुभाष पाटील यांच्या सिद्धनाथ मंगल कार्यालयात दु. 3 वा. हा कार्यक्रम होणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी व्यवसायाकडे वळून स्वावलंबी बनावे. यासाठी सॅटर्डे क्‍लब महिलांसाठी काम करीत आहे. माधवराव भिडे यांनी या क्‍लबची स्थापना केली आहे.   विजेत्या महिलांना बक्षिसेही देण्यात येणार आहेत. शिवाय सभासद महिलांच्यातून विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय काम करणार्‍या महिलांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. 

अधिक माहितीसाठी दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्या संयोजिका मंगल देसावळे (ऑफिस- 02342, 222333 मोबा. 8830604322).