Thu, Apr 25, 2019 21:41होमपेज › Sangli › इस्लामपुरात 4 मे पासून शॉपिंग अँड फूड फेस्टीव्हल

इस्लामपुरात 4 मे पासून शॉपिंग अँड फूड फेस्टीव्हल

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 25 2018 8:48PMसांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबने सभासद तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी कस्तुरी खाद्य खरेदी धमाल या भव्य फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हे  फेस्टीव्हल 4 मे ते 6 मे पर्यंत होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य प्रायोजक म्हणून प्रतिराज युथ फौंडेशन आणि सहप्रायोजक म्हणून शाल्वी एंटरप्रायजेस हे लाभले आहेत.

‘पुढारी कस्तुरी क्‍लब’ आणि प्रतिराज यूथ फौंडेशन आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टीव्हल. या ठिकाणी मनसोक्‍त खरेदीबरोबरच लज्जतदार पदार्थांवर ताव मारता येणार आहे. हे फेस्टीव्हल शुक्रवार दि. 4 मे पासून 6 मे पर्यंत इस्लामपूरमधील जयंत पाटील खुले नाट्यगृहमध्ये सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत खुले राहणार आहे. हे फेस्टीव्हल सर्वांसाठी खुले असणार आहे.

या फेस्टीव्हलमध्ये व्हेज, नॉनव्हेज असो, स्नॅक असो वा जेवण. खान्यावर प्रेम करणार्‍यांना प्रत्येक पदार्थाची चव चाखून बघायला नक्‍कीच आवडते. त्यामुळे मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थांची येथे असंख्य पदार्थ असणार आहेत. मांसाहारी पदार्थांमध्ये बिर्याणी, वडा, कोंबडा, चिकण, बिर्याणी, कबाब, चिकन, लॉलीपॉप, तंदूर, चिकन 65, मटण ताट, खिमा, फिश, मंच्युरियन तर शाकाहारीमध्ये पिझ्झा, ब्रर्गर,  डोसा, उताप्पा, गोबी मंच्युरियन, भेल, पाणीपुरी, सँडविच, पप्स, चीज, झुणका भाकर, व्हेज, पुलाव, सोलकढी, आईस्क्रीम आदी पदार्थ असणार आहेत. मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थांची स्वतंत्र विभाग असणार आहेत.

सोबत मनसोक्‍त खरेदीसाठी गृहउपयोगी वस्तूंची भरपूर व्हरायटी आणि नाविन्यपूर्ण प्रॉडक्टस् असणार आहेत. फेस्टीव्हलच्या स्टॉल बुकिंगसाठी 8805023883, 8805024242 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा.

Tags : pudhari Kasturi Club, Shopping and Food Festival, Islampur,  4th May, sangli,