होमपेज › Sangli › दै. ‘पुढारी कस्तुरी क्‍लब’ महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ 

दै. ‘पुढारी कस्तुरी क्‍लब’ महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ 

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 06 2018 11:39PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबने महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. कस्तुरी क्‍लब व प्रतिराज युथ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या  पहिल्याच वर्षीच्या या फेस्टिव्हलमधून इस्लामपूरकरांंना मनोरंजनाबरोबरच  खवय्यैगिरीचा व शॉपिंगचा आनंद मिळाला, असे गौरवोद‍्गार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी काढले. 

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब व प्रतिराज युथ फाऊं डेशनच्यावतीने येथे सुरू असलेल्या शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलला रविवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी भेट दिली. दै. पुढारीचे इंव्हेन्ट मॅनेजमेंटचे प्रमुख राहुल शिंगणापूरकर, इस्लामपूर कार्यालयप्रमुख अशोक शिंदे यांनी आ. जयंत पाटील यांचे स्वागत केले.  यावेळी प्रायोजक प्रतिराज युथ फाऊंडेशनचे संस्थापक खंडेराव जाधव, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शहाजीबापू पाटील, शाल्वी एंटरप्रायझेसचे नितीन पाटील, आयुब हवलदार उपस्थित होते.

दि. 4 मेपासून सुरू झालेल्या फूड फेस्टिव्हलला रविवारी शेवटच्या दिवशीही हजारो खरेदीदार, खवय्यै व रसिकांची गर्दी होती. फॅशन  शो, मिस व मिसेस कस्तुरी  स्पर्धांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. स्पर्धेदरम्यान हिंदी, मराठी गाणी कलाकारांनी सादर केली. कलाविश्‍व, अण्णासाहेब डांगे कला अ‍ॅकॅडमीच्या कलाकारांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.