Fri, Feb 22, 2019 11:41होमपेज › Sangli › मिरजेत आमदार सुरेश खाडे यांच्या विरोधात निदर्शने

मिरजेत आमदार सुरेश खाडे यांच्या विरोधात निदर्शने

Published On: Jun 20 2018 1:39AM | Last Updated: Jun 20 2018 1:39AMमिरज : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री (स्व.) वसंतदादा पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्या विरोधात किसान चौकात सर्वपक्षीय निदर्शने करण्यात आली. काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव व अनिल आमटवणे यांनी नेतृत्व केले.

यावेळी आमदार खाडे यांंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी  पुतळा काढून घेतला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात चांगलीच झटापट झाली. पाटील यांना सोडावे या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन गोंधळ घातला. यानंतर पाटील यांना सोडून देण्यात आले. यामुळे किसान चौकात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिरज पंचायत समितीच्या नुतनीकरण केलेल्या (स्व.) वसंतदादा पाटील सभागृहाच्या  उद्घाटन समारंभात आमदार  खाडे यांनी (स्व.)वसंतदादा पाटील यांचा   एकेरी नावाने उल्लेख केला होता.  या वक्तव्या विरोधात  आज निदर्शने करण्यात आली.  या आंदोलनात माजी 

महापौर किशोर जामदार, शहर काँग्रेस अध्यक्ष संजय मेंढे, महावीर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब हुळ्ळे, जिल्हा  बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, सलगरेचे सरपंच तानाजी पाटील, प्रमोद इनामदार, अय्याज नायकवडी, जनता दलाचे संजय ऐनापुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोर आदी सहभागी झाले होते. आमदार खाडे यांनी  माफी 

मागावी, अन्यथा त्यांना त्यांची जागा  योग्य वेळी दाखवून देऊ, असा इशारा आमटवणे यांनी यावेळी दिला.ते म्हणाले, विरोधात जाणार्‍या कार्यकर्त्यांच्या अंगावर माणसे सोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न  खाडे यांच्याकडून होत आहे. मालगाव येथील एका कार्यक्रमात त्यांनी आप्पासाहेब हुळ्ळे यांना बेड्या ठोकण्याची भाषा केली आहे. होनमोरे म्हणाले, (स्व.) वसंतदादांचा एकेरी उल्लेख कारणे हे आमदारपदाला शोभत नाही.   खाडे यांनी मिरजेसाठी किती योजना आणल्या आणि येथील किती तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला, ते एका स्टेजवर येऊन सांगावे.