Wed, Jul 17, 2019 00:44होमपेज › Sangli › वेश्या व्यवसायप्रकरणी दोघांना अटक

वेश्या व्यवसायप्रकरणी दोघांना अटक

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 11:29PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मिरजेतील प्रेमनगर येथे पोलिसांनी एका सामाजिक संस्थेच्या पथकासह छापा टाकून अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍या एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. यावेळी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलेल्या तीन पीडित अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. 

याप्रकरणी जानकी कुलदीप सिंग (वय 33, सध्या रा. मिरज, मूळ रा. मालवीनगर, इलाहाबाद, उत्तरप्रदेश),  सौरभसिंग ऊर्फ सौरभ आसुदे वय 38, सध्या रा. एकोंडी, ता. जत, मूळ रा. इलाहाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील एक संशयित शम्मू (पूर्ण नाव नाही) फरारी आहे. फ्रीडम फर्म संस्थेला जानकी अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली होती. 

संस्थेने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला कारवाईचे आदेश दिले. कक्षाकडील अधिकारी, कर्मचारी व फ्रीडम फर्म संस्थेच्या सदस्यांच्या पथकाने मिरजेतील प्रेमनगर येथे छापा टाकला. त्यावेळी जानकीसह सौरभला अटक करण्यात आली.  तीन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली असून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघाही संशयितांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.