Mon, Jun 24, 2019 17:04होमपेज › Sangli › आरोग्य कर्मचार्‍यांच्या सेवा भरती नियमात बदल होणार : पंकजा मुंडे

आरोग्य कर्मचार्‍यांच्या सेवा भरती नियमात बदल होणार : पंकजा मुंडे

Published On: Feb 11 2018 12:56AM | Last Updated: Feb 10 2018 9:30PMसांगली ः प्रतिनिधी

आरोग्य कर्मचार्‍यांच्या सेवा भरती नियमात एक महिन्यात बदल केला जाईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सचिव असिमकुमार गुप्ता यांनी दिली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांची वेतनत्रुटी व पदनाम बदलाची बारा वर्षांची मागणी मार्गी लागली आहे, असे जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरूण खरमाटे यांनी सांगितले. 

आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शिष्टमंडळाबरोबर मंत्रालयात बैठक झाली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, ग्रामविकासचे सचिव असिमकुमार गुप्ता, उपसचिव गिरीश भालेराव, डिग्गीकर, उपसचिव मोरे, सहसंचालिका सुश्रुषा बनसोडे तसेच आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष  अरूण खरमाटे, सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, हसिना शेख, राजेंद्र बैरागी, एस. एम. पाटील उपस्थित होते. 

एमएससीआयटी, मुदतवाढ, अर्धवेळ स्त्री परिचरबाबत येत्या आर्थिक वर्षात वेतनवाढीची शिफारस करणाार असल्याची घोषणाही मुंडे यांनी केली. याबाबत एक महिन्यात निर्णय घेण्याचे आदेशही त्यांनी 
दिले. 

दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रांना दोन आरोग्य सहाय्यिका पदे होती. मात्र सन 2006 पासून एक पद कमी केले. आता दुसरे पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार आहे. कंत्राटी पद्धतीने पद भरण्यास संघटनेचा विरोध आहे. दोन्ही पदे पूर्ववत नियमित वेतनश्रेणीत पाहिजेत अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा खरमाटे यांनी दिला आहे.