होमपेज › Sangli › प्रतीक्षा गळवेचा खुनी शोधून काढून कारवाई करा

प्रतीक्षा गळवेचा खुनी शोधून काढून कारवाई करा

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 11:14PMसांगलीः प्रतिनिधी

प्रतीक्षा  गळवेच्या खून प्रकरणातील आरोपीस अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी. आरोपीस मदत करणार्‍यास सहआरोपी करुन गुन्हे दाखल करावेत, या मागण्यांसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  गुरुवारी मुंडण आंदोलन करण्यात आले. 

गळवेवाडी(ता. आटपाडी) येथे प्रतिक्षावर अत्याचार करून तिचा दि.7 जानेवारी रोजी निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत  फेकून देण्यात आला. महिना झाला तरी या प्रकरणाचा छडा लावण्यात आणि आरोपीस पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे प्रतिक्षाचे वडील आणि ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. 

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये महेश खराडे,  प्रल्हाद नरळे, अभिमन्यू क्षीरसागर, नामदेव हिप्परकर, बाबासो गोडसे, विशाल हिप्परकर, शिवाजी क्षीरसागर, विनोद खोत, विजय नरळे आदी  सहभागी झाले होते. पाच जणांनी प्रतिकात्मक मुंडण आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

त्यामध्ये हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. हा तपास सी. आय. डी. कडे देण्यात यावा. पिडीत कुटुंबाला वीस लाखाची अर्थिक मदत मिळावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.