Thu, Sep 20, 2018 02:53



होमपेज › Sangli › प्रतिक्षा गळवे खून प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन 

प्रतिक्षा गळवे खून प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन 

Published On: Feb 08 2018 7:47PM | Last Updated: Feb 08 2018 7:47PM



सांगलीः प्रतिनिधी

प्रतिक्षा गळवेच्या खून प्रकरणातील आरोपीस अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी, आरोपीस मदत करणार्‍यास सहआरोपी करुन गुन्हे दाखल करावेत. आदी मागण्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मुंडण आंदोलन करण्यात आले. 

गळवेवाडी (ता. आटपाडी) येथे प्रतिक्षा गळवेवर अत्याचार करून तिचा ७ जानेवारी रोजी निघृण खून करण्यात आला होता. त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत  फेकून देण्यात आला. महिना झाला तरी या प्रकरणाचा छडा लावण्यात आणि आरोपीस पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे प्रतिक्षाचे वडील आणि ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये महेश खराडे,  प्रल्हाद नरळे, अभिमन्य क्षिरसागर, नामदेव हिप्परकर, बाबासो गोडसे, विशाल हिप्परकर, शिवाजी शिरसागर, विनोद खोत, विजय नरळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. 

पाच जणांनी प्रतिकात्मक मुंडण आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. हा तपास सी. आय. डी. कडे देण्यात यावा. पीडित कुंटुंबाला २० लाख रूपयांची अर्थिक मदत मिळावी. या मागण्या करण्यात आल्या आहेत.