Sat, Jun 06, 2020 19:53होमपेज › Sangli › सांगली:  मानटे खून प्रकरणी दोघांचे निलंबन

सांगली:  मानटे खून प्रकरणी दोघांचे निलंबन

Published On: Jul 19 2018 6:09PM | Last Updated: Jul 19 2018 6:09PMसांगली: पुढारी ऑनलाईन

जिल्हा पोलिस दलातील समाधान मानटे यांच्या खून प्रकरणी गुरुवारी मोठी कारवाई करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश भिंगरदेवे आणि राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक गणेश गुरुव यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी ही माहिती दिली.

हॉटेल रत्ना डिलक्समध्ये मानटे यांचा खून झाला होता. याप्रकरणी सांगली महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने हॉटेलला सील केले आहे. आचारसंहितेचा भंग करत रात्री उशिरापर्यंत बार सुरु ठेवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान, रत्ना हॉटेल डीलक्सवर कारवाई करा या मागणीसाठी पोलिसांचे नातेवाईक आज रस्त्यावर उतरले. त्यांनी पोलिस मुख्यालयावर मोर्चा काढला होता. हॉटेल मालकाने मृतदेह हलवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा  आरोप मानटे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.