Fri, Apr 26, 2019 03:20होमपेज › Sangli › पतंगराव कदम अनंतात विलीन (Video)

पतंगराव कदम अनंतात विलीन (Video)

Published On: Mar 10 2018 5:46PM | Last Updated: Mar 10 2018 6:51PMसांगली : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातील कर्मयोगी, अविरत कार्यरत नेता, भारती विद्यापीठाचे हमंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांना शनिवारी सायंकाळी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांचे चिरंजीव युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्‍नी दिला. 

स उपस्थित  जनसमुदायाला अश्रू रोखता आले नाहीत. दरम्यान, त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण परिसरात  लाखोंचा  जनसमुदाय लोटला होता. 

हेलिकॉप्टरने मूळ गावी पार्थिव
आमदार डॉ. कदम गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती इस्पितळात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी 2.30 च्या दरम्यान पार्थिव त्यांच्या मूळ गावी सोनसळ (ता. कडेगाव) येथे हेलिकॉप्टरने आणले. त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी प्रचंड गर्दी लोटली होती. 

सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळावर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार होते. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून महाराष्ट्रच एकवटला होता. नेत्याच्या दर्शनासाठी प्रतीक्षेचा बांध फुटल्याने पार्थिव पोलिस बंदोबस्त झुगारून जनसागर कारखान्यात शिरला. गर्दीचा आवाका व अंत्यसंस्कारासाठी विलंब होईल हे लक्षात घेऊन तेथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नेण्यास फाटा देण्यात आला. त्याऐवजी थेट सोनसळ येथून पार्थिव रुग्णवाहिकेतून  वांगी येथे अंत्यसंस्कार स्थळावर नेण्यात आले. 

मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष  अशोक चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश,  शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,  पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,  खासदार उदयनराजे भोसले, खासदार संजय पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदिंनी आपल्या भाषणात डॉ. कदम यांना श्रद्धांजली वाहिली. 

खासदार राजीव सातव, माजी मंत्री प्रतिक पाटील, माजी मंत्री विनय कोरे, आमदार अनिल बाबर, शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, सुमनताई पाटील, विजयसिंह  मोहिते-पाटील, शंभूराजे देसाई, जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अमरिंदरसिंग राज ब्रार, माजी मंत्री बबनराव पाचपुते, सदाशिवराव  पाटील, अरुण लाड, प्रा. शरद पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कृपाशंकरसिंह, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, देवराज पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम, वैभव नायकवडी, विनोद गुळवणी, निवेदिता माने,   मनसिंगराव नाईक, नितीन शिंदे, प्रकाश आवाडे,  प्रकाश शेंडगे, अरुण लाड, दिगंबर जाधव, श्रीमती अनिता सगरे, बापूसाहेब पाटील, स्थायी सभापती बसवेश्‍वर सातपुते, संजय बजाज आदी मान्यवर उपस्थित होते. 

शासकीय इतमामातअंत्यसंस्कार
साडे पाच वाजण्याच्या सुमारास  शासकीय इतमामात अंत्यसंस्कांरांना सुरुवात झाली. पोलिसांनी हवेत बंदुकीच्या  फैरी झाडून व पोलिस बँडने त्यांना सलामी दिली.  पावणेसहाच्या दरम्यान डॉ. विश्‍वजीत यांनी त्यांच्या पार्थिवाला विधीवत अग्नी दिली. यावेळी लाखोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदाला अश्रू आवरता आले नाहीत. 
डॉ. कदम यांचे बंधू आमदार मोहनराव कदम, भारती विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, जयसिंग कदम, शांतारामबापू कदम, महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम, डॉ. राहुल कदम आदी उपस्थित होते. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष एस. एफ. कदम, युवक काँग्रेसचे इंद्रजित साळुंखे, नगरसेवक राजेश नाईक आदींनी नियोजन केले.  

रक्षाविसर्जन सोमवारी 
रक्षाविसर्जन सोमवारी वांगी येथे अंत्यसंस्कारस्थळीच  सकाळी 10 वाजता होणार आहे.

संबंधित बातम्या 

मृत्यूची बातमी...आणि अवघा जिल्हा हळहळला

डोक्यावर पत्र्याची पेटी..खिशात ११ रूपये..साकारलं विद्यापीठ

अजातशत्रू  राजकारणी हरपला