Mon, Nov 19, 2018 21:50होमपेज › Sangli › पतंगराव कदम यांची तब्बेत उत्तम : विश्वजित कदम 

पतंगराव कदम यांची तब्बेत उत्तम : विश्वजित कदम 

Published On: Feb 28 2018 7:57PM | Last Updated: Feb 28 2018 7:57PMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेसचे जेष्ठ नेते कडेगाव -पलूस मतदार संघाचे भाग्यविधाते आ.डॉ पतंगराव कदम यांची तब्बेत उत्तम असून  प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते लवकरच पुर्ववत आपणा सर्वांच्या भेटीकरिता येत असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले. पतंगराव कदम यांच्या आरोग्यबाबत कृपया कोणत्याही आफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही विश्वजित कदम यांनी केले.

सोशल मीडियावर पंतगराव कदम यांच्या तब्बेतीविषयी अफवा पसरविण्यात आल्याने डॉ. विश्वजित कदम यांनी नागरिकांना आवाहन केले. त्‍यांच्या तब्बेतीमध्ये सुधारण्या होत असून ते लवकर नागरिकांच्या भेटीला येत असल्याचेही त्यांनी सांगितले.