Wed, Nov 14, 2018 21:16होमपेज › Sangli › कोणत्याही कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही

कोणत्याही कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कडेगाव : शहर प्रतिनिधी 

मी डॉ. पतंगराव कदम होऊ शकत नाही, परंतु त्यांनी कडेगाव-पलूस मतदारसंघात वारकरी म्हणून काम केले. त्यांनी निर्माण केलेल्या या पंढरीचा वारकरी म्हणून काम करेन, कोणत्याही कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही. अहोरात्र आपल्या सेवेसाठी काम करेन, असे प्रतिपादन डॉ. विश्‍वजित कदम यांनी केले.

डॉ. पतंगराव कदम यांना आदरांजली वाहण्यासाठी कडेगाव येथे सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आमदार मोहनराव कदम, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शांताराम कदम, डॉ. जितेश कदम, महेंद्र लाड, लालासाहेब यादव, राजाराम गरुड, गुलाम पाटील, दीपक भोसले, सुरेश निर्मळ, संजय विभूते, पृथ्वीराज कदम आदी  उपस्थित होते.  

डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव- पलूसला आपले कुटुंब मानून सर्वांगीण विकास केला आहे. त्यांच्याप्रमाणे सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहे. माझ्या बालपणी ते  घरी फारसे राहायचे नाहीत. ते 24 तास बारा महिने मतदारसंघाच्या कामानिमित्त बाहेर असायचे, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, राजकारणापुरता आमचा संघर्ष असायचा. विकासकामात त्यांनी कधीच राजकारण आणले नाही.विकासकामात आम्ही नेहमीच एकत्र आलो.  ज्येेष्ठ नेते लालासाहेब यादव, भीमराव मोहिते, तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, कडेगाव नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, मोहनराव यादव, सुनील पाटील, मालन मोहिते, सत्यजित देशमुख,  सुहाना शेख  यांच्यासह अनेकांनी आदरांजली वाहिली.

साजिद पाटील, महेश कदम, शरद कदम, सागरेश्‍वर ए. बी. चालुक्य, अविनाश जाधव, सागर सूर्यवंशी, दिनकर जाधव, सिराज पटेल, सुनील पवार, वैभव देसाई उपस्थित होते.


  •