होमपेज › Sangli › जिल्हाधिकारी कार्यालयावर पारधी समाजाचा मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयावर पारधी समाजाचा मोर्चा

Published On: Dec 11 2017 6:49PM | Last Updated: Dec 11 2017 6:46PM

बुकमार्क करा

सांगली : पुढारी ऑनलाईन                                                                                                             

आदिवासी पारधी समाजाचे पुनर्वसन व्हावे, शिक्षण घेतलेल्या मुलांना नोकरी मिळावी यांसह आदी मागण्यासाठी पारधी समाजाचे लोक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. समाजावून त्यांना परत पाठवण्यात आले. दरम्यान या प्रकरणी दलित महासंघाचे संतोष कांबळे यांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पारधी समाजाचे पुर्नवसन करावे, अशी मागणी अनेक वर्षापासून या  समाजाची आहे. यासाठी त्यांनी यापूर्वी अनेकवेळा आंदोलन छेडले आहे. मात्र त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. या मागण्यासंदर्भात आज गुंडाबाई काळे,  सुरवंती पवार, शोभा पवार, चिवळी पवार आदी जिल्हाधिकार्‍यांना भेटण्यासाठी आले होते. या सर्वांना पोलिसांनी गेटवरच आडवले. काही वेळानंतर ते अचानक कार्यालयात घुसले. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुन कुलकर्णी यांनी त्यांची समजूत काढली.