होमपेज › Sangli › पलूस-कडेगाव पोटनिवडणूक;  तीन उमेदवारी अर्ज अवैध 

पलूस-कडेगाव पोटनिवडणूक;  तीन उमेदवारी अर्ज अवैध 

Published On: May 12 2018 1:36AM | Last Updated: May 11 2018 11:06PMकडेगाव : शहर प्रतिनिधी

पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी 12 जणांनी  उमेदवारी अर्ज दाखल  केले होते. त्यापैकी 9 अर्ज वैध ठरले. तीन अर्ज अवैध ठरले आहेत. ही   माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी दिली.

काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्‍वजित कदम, भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख, अपक्ष  प्रमोद गणपतराव पाटील ,सतीश सर्जेराव पाटील ,मोहन विष्णू राऊत,अभिजित वामनराव आवाडे,बजरंग धोंडिराम पाटील, विलास कदम आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे मिलिंद काशीनाथ कांबळे यांचे अर्ज वैध ठरले आहेत.  सागरेश्‍वर सूत गिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड यांचे अर्ज अवैध ठरले. पक्षाचे ए.बी.फॉर्म नसल्याने हे तीन अर्ज बाद झाले. अर्थात काँग्रेस आणि भाजपने ते डमी म्हणूनच दाखल केले होते.