Thu, Nov 15, 2018 03:15होमपेज › Sangli › दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे मिरजेत झुंबा वर्कशॉपचे आयोजन

दैनिक पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे मिरजेत झुंबा वर्कशॉपचे आयोजन

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 29 2018 8:59PMसांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब, सांगली व बालाजी फिटनेस सेंटर,  मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व वयोगटातील महिलांसाठी दि. 2 जुलै ते दि. 7 जुलै या कालावधीत सहा दिवसांच्या झुंबा वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्कशॉपमध्ये प्राची इनामदार यांचे झुंबा प्रशिक्षण मिळणार आहे.  व्यायामाकडे वेळेअभावी किंवा कंटाळा आला म्हणून आपण दुर्लक्ष करतो. मात्र या नृत्यप्रकारातून मनोरंजन आणि व्यायाम असे दोन्ही फायदे मिळतात. हा वर्कशॉप दि. 2 जुलैपासून मिरज येथील बालाजी फिटनेस सेंटर येथे सायंकाळी 4 ते 5 या वेळेत होणार आहे. सदरचा वर्कशॉप सर्व महिलांसाठी मोफत आहे. यात सहभागी होऊ इच्छिणार्‍या महिलांनी नाव नोंदणी  करावी. यासाठी 11 ते 5 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी  मो. 7385816979, फोन : (0233) 6729999 येथे संपर्क साधावा.