Thu, Apr 18, 2019 16:05होमपेज › Sangli › सांगलीत गंगा एजन्सीजच्या शोरूमचे उद्घाटन

सांगलीत गंगा एजन्सीजच्या शोरूमचे उद्घाटन

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Sep 01 2018 12:44AMसांगली : प्रतिनिधी 

येथील शंभर फुटी रस्त्यावरील गंगा एजन्सीज या शोरूमचे उद्घाटन शुक्रवारी झाले. दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. गंगा एजन्सीज हे ल्युमिनियस बॅटरी आणि इन्व्हर्टरचे सांगली जिल्ह्याचे अधिकृत मुख्य वितरक आहेत. या शोरूममध्ये घरगुती आणि व्यापारी संकुलात वापरण्यासाठीची सोलर सिस्टीम, स्टॅबिलायझर, यूपीएस (ऑनलाईन आणि ऑफलाईन), इर्न्व्हटर, बॅटरी,  होम प्रोटेक्शन सिस्टीम आदी उपलब्ध आहेत.

यावेळी सौ. गीतादेवी प्रतापसिंह जाधव, रामदास मिस्कीन, सौ. लीला मिस्कीन, विजयराव साळुंखे, विक्रमसिंह सावर्डेकर (पाटील), गोपाळ पवार, गणपतराव पाचुंदे, शैलेश पवार, मिरज पंचायत समिती सदस्य अशोक मोहिते, पी. एल. रजपूत, नारायण पुकाळे, सुनील जाधव, किशोर हेगडे, प्रवीण पाटील, शरद देशमुख, महेश अनमल, संतोष बजाज, महेश खंडागळे  आदी मान्यवर उपस्थित होते. गंगा एजन्सीजचे संचालक सत्यजित मिस्कीन, प्रीतम साळुंखे, संतोष पुकाळे यांनी स्वागत केले.