Wed, Jul 24, 2019 06:46होमपेज › Sangli › सांगली : सद्भावना एकता रॅलीत विद्यार्थिनीचा मृत्यू

सांगली : सद्भावना एकता रॅलीत विद्यार्थिनीचा मृत्यू

Published On: Jan 14 2018 2:01PM | Last Updated: Jan 14 2018 2:44PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सांगली येथे आयोजित सद्भावना रॅलीत सहभागी झालेल्या एका शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ऐश्वर्या शशिकांत कांबळे असे तिचे नाव असून ती १४ वर्षाची होती. ऐश्वर्याला चक्कर आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

ऐश्वर्या कन्या पुरोहित शाळेची विद्यार्थिनी आहे. ती आज शहरात होणाऱ्या सद्भवना एकता रॅलीमध्ये सहभागी झाली होती. रॅली संपवून परतत असताना स्टेशन चौकतील विठठल मंदिरा जवळ ऐश्वर्याला चक्कर आली. यामुळे ऐश्वर्याला तातडीने सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

ऐश्वर्याचा मृत्यू झाला ही दुर्देवी घटना आहे. तिला काल ताप आला होता असे घरच्यांनी सांगितले, शवविच्छेदनानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल असे, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले.

भीमा-कोरेगावच्या निमित्ताने महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात सामाजिक वातावरण कलुषित झाले आहे. हेच सावट दूर करण्यासाठी सांगलीकरांनी एकता रॅलीचे आयोजन केले होते. राजकारण, समाजकारण आणि सामाजिक ऐक्याची उज्ज्वल परंपरा असलेला सांगली शहर व जिल्हा आहे. देशाला आदर्श घालून देणार्‍या सांगली जिल्हा आणि शहरात नुकत्याच बाहेर घडलेल्या संशयास्पद घटनांचे पडसाद वातावरण कलुषित करीत आहेत. यावेळी सर्वांनी ऐक्यासाठी पुढाकार घेतला आहे. हे वातावरण या सद्भावना रॅलीने निवळेल यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.