Thu, Jan 17, 2019 10:17होमपेज › Sangli › सत्तूर आणि एअरगन बाळगणार्‍यास अटक

सत्तूर आणि एअरगन बाळगणार्‍यास अटक

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 10:59PMसांगली : प्रतिनिधी

पलूस येथे धारदार शस्त्रे सत्तूर, एअरगन बाळगणार्‍या एकास अटक करण्यात आली. राजू ऊर्फ वक्या हुसेन मुल्ला (वय 40, रा. आंधळी) असे त्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या (एलसीबी) पथकाने ही कारवाई केली. त्याला पलूस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश एलसीबीला दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे एक पथक पलूस परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी मुल्ला धारदार शस्त्रे जवळ बाळगत असल्याची माहिती पिंगळे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने त्याच्या घरी छापा मारल्यानंतर त्याच्याकडे एक धारदार सत्तूर, एक एअरगन, चार विविध कंपन्यांचे मोबाईल असा मुद्देमाल सापडला. त्याच्याविरोधात पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पलूस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर गोरे, राजू मुळे, संजय पाटील, सचिन कनप यांनी ही कारवाई केली.