Wed, Jul 17, 2019 20:05होमपेज › Sangli › असा गुरु मिळण्यास भाग्य लागते : राहुल महादेव नवले

असा गुरु मिळण्यास भाग्य लागते : राहुल महादेव नवले

Published On: Sep 05 2018 10:08AM | Last Updated: Sep 05 2018 10:08AMप्रा. सदाशिव मोरे हे माझे गुरू असून त्यांच्याविषयी बोलावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी समाजामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. गेली १५ वर्ष झाली असतील ते श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि खास म्हणजे ते राष्ट्रीय सेवा योजनेचे सांगली जिल्हा समन्वयक आहेत. त्यांनी NSS च्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याचा ठसा अख्या महाराष्ट्रभर उमटवला आहे.त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य कसे करायचे व त्यातून काय मिळते. यांचे सर्व मार्गदर्शन ते प्रत्येक कार्यक्रमात ते सांगत असतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज सांगली जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये अग्रेसर असलेले आपणाला दिसून येते.

 त्यांच्यामुळे मला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजच चांगले कार्य करण्याची संधी मिळाली. सर एक सच्चे सामाजिक कार्यकर्ते आहेत असे म्हणावे लागेल कारण त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आटपाडी तालुक्यातील य.प वाडी गाव. आज त्यांच्या मार्गदर्शनामुळे व लोकांच्या प्रामाणिक सहकार्यामुळे आज संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सलग दोन वेळा सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि आता विभागीय पातळीवर निवड झाली आहे.  मला अभिमान आहे की मी त्यांचा एक विद्यार्थी आहे. असे गुरू मिळणे भाग्य लागते असे मी समजतो. त्याच्या मार्गदर्शनामुळे मला समाजकार्याची आवड लागली. त्यांनी आम्हाला माणसातील माणूसपण ओळखायला शिकवले. 

प्रत्येक व्यक्तीचा आदर करणे मग तो लहान असो मोठा. ते म्हणतात की आपण जसे बोलतो,वागतो, कार्य करतो तसेच आपणाला त्यांच्याकडून  प्रतिसाद मिळत असतो. माझ्या गुरूंकडून मला खूप काही मिळाले आहे, त्यांनी माझ्या आयुष्यात खूप बदल घडवून आणला आहे व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची त्यांनी मला संधी दिली आहे. सरांनी दिलेली शिकवण मी आयुष्य भर विसरणार नाही.त्यांनी जो मार्ग दाखवला आहे त्याच मार्गाने मी समाजात कार्य करत राहीन , सर तुमचा असाच आशिर्वाद आमच्यावर राहु द्या ही विनंती. 

-राहुल महादेव नवले