Tue, Jul 23, 2019 16:42होमपेज › Sangli › सांगलीत नर्सिंगच्या विद्यार्थींनींचा मोर्चा      

सांगलीत नर्सिंगच्या विद्यार्थींनींचा मोर्चा      

Published On: Dec 19 2017 2:16PM | Last Updated: Dec 19 2017 2:16PM

बुकमार्क करा

 सांगली : प्रतिनिधी 

 राज्य सरकारने नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत तातडीने  निर्णय घ्यावा. या मागणीसाठी  जिल्ह्यातील विविध नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीचे आज  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. विश्रामबाग येथून या मोचास सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.   

 राज्यातील भटके विमुक्त जाती व जमाती, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार्‍या मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क संदर्भात शासनाने निर्णय न घेतल्यास हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाणार असून अनेक शैक्षणिक संस्थां बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 

याबाबत सरकारने   नियुक्त केलेल्या विशेष चौकशी पथकाने राज्यातील शैक्षणिक संस्थांची तपासणी करुन,  शैक्षणिक  संस्थांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अहवाल सादर केला आहे . त्याशिवाय शिष्यवृत्तीचे प्रलंबीत असलेले प्रस्ताव मंजूर करावेत, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळावी. विद्यार्थींना वैयक्तीक मेहनताना वेळेवर मिळावा. पोलिसांच्या निर्भया पथकाने नर्सिंगच्या विद्यालयांनाही भेट द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.