Wed, Jan 23, 2019 08:36होमपेज › Sangli › राजकीय पक्ष काढण्याचा विचार नाही : अनासपुरे

राजकीय पक्ष काढण्याचा विचार नाही : अनासपुरे

Published On: Apr 09 2018 7:43PM | Last Updated: Apr 09 2018 7:43PMसांगली : प्रतिनिधी

राजकीय पक्ष काढण्याचा आमचा कोणताही विचार नाही. 'नाम'च्या माध्यमातून महाराष्ट्र टंचाईमुक्त कऱणे आणि शेतकर्‍यांना चांगले दिवस आणणे हेच माझे स्वप्न आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाऊंडेशनचे प्रमुख मकरंद अनासपुरे यांनी येथे केले. 

अनासपुरे यांच्या ‘उलट सुलट’ या प्रयोगातून आभाळमाया फांऊडेशन यांच्या प्रयत्नातून जमा झालेले ८ लाख ८८ हजार ८८८ रुपयाचा धनादेश प्रमोद चौगुले यांच्याकडून जलयुक्त शिवारच्या कामासाठी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्याकडे देण्यात आला. त्या प्रसंगी अनासपुरे बोलत होते. 

आमच्या या उपक्रमास सर्वच पक्ष, संघटना यांचे पाठबळ आहे. राज्यातील विविध भागात २०० ठिकाणी आमची कामे सुरु आहेत.   जिल्ह्यात २० ठिकाणी कामे झाली असून त्यामुळे २८८ हेक्टर क्षेत्र ओलीता खाली आले आहे. या वर्षी ५० गावे निवडण्यात आली असून १३ गावात  काम सुरु झाले आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवले जात आहेत. जत तालुक्यात तुतीमुळे शेतकर्‍यांना एकरी   एक लाख रुपये मिळत आहेत. शेतीमालास दीडपट भाव मिळावा आणि स्वामिनाथन आयोग लागू करावा, अशी आमची मागणी आहे. शेतकर्‍यांची व्यथा समाजासमोर मांडण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आम्ही बीजरोपण केले आहे. त्याचा वटवृक्ष व्हावा, अशी  अपेक्षा आहे, असे अनासपुरे म्‍हणाले. 

तसेच झाड लावण्याची मोहिम शालेय स्तरापासून सुरू व्हायला हवी. ती केवळ तांत्रीक प्रक्रिया होऊ नये. झाड लावल्यानंतर ते तीन वर्षे जगवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांकडे द्यायला हवी. त्यामुळे झाडांची संख्या वाढेल. त्या शिवाय पुढे हे विद्यार्थी झाडे तरी तोडणार नाहीत, असा आशावाद अनासपुरेंनी व्यक्‍त केला.

Tags : naam, sangali, sangali news, makarand anaspure, political party