Mon, Apr 22, 2019 01:43होमपेज › Sangli › वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी भरीव निधीची गरज

वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी भरीव निधीची गरज

Published On: Dec 01 2017 9:10AM | Last Updated: Nov 30 2017 8:29PM

बुकमार्क करा

शिराळा : विठ्ठल नलवडे

वाकुर्डे बुद्रूक उपसा जलसिंचन योजनेसाठी भरीव निधीची गरज आहे.  उत्तरभागातील शेतकर्‍यांना वाकुर्डेमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. वाकुर्डेचे पाणी, कार्वे, रेठरेधरण तलावात येणार आहे. त्यासाठी निधीची गरज आहे. मानकरवाडी तलावात वाकुर्डेचे पाणी आहे. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी पुढच्या वर्षी वाकुर्डेचे पाणी रेठरेधरण कार्वेपर्यंत येणार असल्याची घोषणा केली. आमदार शिवाजीराव नाईक यांचा वाकुर्डे योजनेसाठी पाठपुरावा सुरू आहे.

वाकुर्डेचे पाणी आता बंद पाईपमधून जाणार

कॅनॉलच्या गळतीचा मोठा प्रश्‍न निर्माण होत आहे. तसेच शेतकर्‍यांची जमीन कॅनॉलसाठी संपादित करावी लागत आहे. त्यामुळे सेना-भाजप सरकारने वाकुर्डेची पुढील कॅनॉलची कामे बंद पाईपमधून होणार आहे. कॅनॉलची गरज नाही, असे सांगितले. सन 2000 पासून वाकुर्डेची कामे सुरू करण्यात आली. पंपगृह, कालवे, बोगद्याची कामे 2002 पासून बंद ठेवण्यात आली. त्यानंतर सन 2004-05 मध्ये डोंगराळ क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत योजनेला 25 कोटी निधी उपलब्ध झाला.

वाकुर्डे योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता- 19 ऑक्टोबर 1998 मिळाली. त्यावेळी 109.68 कोटी रुपये खर्च केला.  याचा     शिराळा तालुका- 16 हजार 380 हेक्टर, वाळवा तालुका- 7290 हेक्टर, कराड तालुका- 2200 हेक्टर. एकूण- 15775 हेक्टर क्षेत्राला लाभ  मिळाला.

पण वाकुर्डे बुद्रूक योजनेचा खर्च वाढत जात आहे. निधी पूर्ण न मिळाल्यामुळे कामे थांबली आहेत. ठेकेदाराचे पैसे अडकले आहेत. 25 कोटीचा निधी मिळाल्यावर पुन्हा कामे संथगतीने सुरू झाली.

या योजनेला सुधारित मान्यता 2004   ला मिळाली. त्यावेळी 332.31 कोटी लाभ क्षेत्र 19 हजार 505 हेक्टर होते. त्यानंतर द्वितीय प्रशासकीय मान्यता मिळाली. 541.01 कोटी लाख क्षेत्र झाले. 28 हजार 35 हेक्टर ही योजना त्वरित व्हावी. निधी मिळावा. यासाठी त्यावेळचे शिवाजीराव देशमुख, आ. जयंत पाटील, माजी आ. शिवाजीराव नाईक, आ. मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख एका झेंड्याखाली होते. 

यासाठी मुंबई   येथे  बैठका झाल्या. लाभ क्षेत्रातील गावांची संख्या वाढली. वाकुर्डे योजनेचे दोन भाग झाले. पाण्यापासून वंचित असणारी शिराळा-वाळवा तालुक्यातील गावे समाविष्ट झाली. परंतु निधीची पूर्तता झाली नाही. 

शिराळा-वाळवा तालुक्याचे क्षेत्र वाढले. परंतु कराडचे 2200 हेक्टर कायम राहिले. वाकुर्डेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. त्याचा फायदा कराड तालुक्याला जादा होणार, यावरून राजकीय संघर्ष वाढला आहे.