Thu, Apr 25, 2019 07:43होमपेज › Sangli › विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 03 2018 11:39PMसांगली : प्रतिनिधी

आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. त्यानुसार त्यांनी काँग्रेसच्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये परभणी-हिंगोलीसाठी सुरेश देशमुख, अमरावतीसाठी अनिल गडिया आणि चंद्रपूरसाठी इंद्रकुमार सराफ यांना संधी देण्यात आल्याचे सांगितले.

ते म्हणाले, दि. 21 मे रोजी विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. अमरावती, परभणी-हिंगोली व चंद्रपूर या जागांवर काँग्रेस लढेल, तर लातूर, कोकण आणि नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली आहे. 

चव्हाण म्हणाले, राज्यात होणार्‍या तीन विधानसभा पोटनिवडणुकांबाबत अद्याप आघाडीचा निर्णय निश्‍चित झालेला नाही. मात्र, पलूस-कडेगाव आणि पालघर आणि येथील जागा काँग्रेस लढविणार आहे. भंडारा-गोंदियाच्या जागांबाबत आमचा आग्रह नाही. त्यामुळे लवकरच याबाबतचा निर्णय होईल.