Mon, Sep 24, 2018 20:48होमपेज › Sangli › राष्ट्रवादीचा हल्लाबोल नसून डल्लाबोल : खोत

राष्ट्रवादीचा हल्लाबोल नसून डल्लाबोल : खोत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बांबवडे : वार्ताहर 

सध्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधी पक्ष सत्तेशिवाय जगू शकत नाही. त्यांचा राज्यभर चाललेला हल्लाबोल नसून डल्लाबोल असल्याची टीका राज्याचे कृषिराज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी केली .

कासेगाव (ता. वाळवा) येथे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधी व इतर माध्यमातून विकासकामांचे भूमिपूजनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार नाईक होते. प्रसाद पाटील, नगरसेवक विक्रम पाटील, लालासाहेब धुमाळ, पांडुरंग वाघमोडे उपस्थित होते . 

प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. आमदार नाईक म्हणाले, कासेगावसह परिसरात 12 कोटी 61 लाख रुपयाची कामे केली असून वाकुर्डे योजनेचे लवकरच टेंडर निघणार आहे. सूत्रसंचलन शहाजी मिसाळ यांनी केले. शंकर पाटील यांनी आभार मानले. स्वातंत्र्यसैनिक बापूसो शिंदे, सरपंच विनायक निकम, भाऊसो निकम, प्रकाश पाटील, कृष्णदेव शेळके उपस्थित होते.
 


  •