Mon, Jan 21, 2019 06:47होमपेज › Sangli › उद्धवला राजकारणाचा गंध नाही : नारायण राणे

उद्धवला राजकारणाचा गंध नाही : नारायण राणे

Published On: Dec 09 2017 2:13PM | Last Updated: Dec 09 2017 3:00PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

भाषण १८ मिनिटांच्यावर जातच नसल्याने आणि केव्हा काय बोलावे हे त्यांनी उद्धव ठाकरे यांना  कळत नाही. त्यांना राजकारणाचा गंध नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी सांगलीत केली. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या बांधणीसाठी सांगलीत दाखल झाले आहेत.

राणे म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना त्रास दिला. आता जर त्यांनी तोंड बंद ठेवले नाही तर, त्यांनी काय त्रास दिला हे उडघडकीस आणेन. त्यांनी माझ्यावर टीका टिप्पणी करण्याऐवजी विकास आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याच काम करावे. उद्धवला राजकारणाचा गंध नाही. केव्हा काय बोलावे हे कळत नाही. अठरा मिनिटांच्यावर या भाषण जातच नाही, १६ मिनिटे टीका करणे आणि ३ मिनिट गोंजारणे इतकेच त्यांना जमते.' 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याचे सांगताना राणे म्हणाले, ‘माझा विश्वासघात कोण करेल असे वाटत नाही. मला जो विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला आहे तो विश्वास मुख्यमंत्री पूर्ण करतील. मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात आणि देशात काँग्रेस पक्षाची दशा दिशाहीन झाली आहे. सध्या गुजरात निवडणुकीत चुरस दिसत असली तरी तिथे भाजपच विजयी होईल.

संबंधित बातम्या वाचा : उद्धव ठाकरेंना नाक राहिलेले नाही : राणे

संबंधित बातम्या वाचा : शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी : नारायण राणे