Sat, Feb 23, 2019 00:36होमपेज › Sangli › नागठाणे येथे उसाला आग लागून २५ लाखांचे नुकसान

नागठाणे येथे उसाला आग लागून २५ लाखांचे नुकसान

Published On: Dec 23 2017 2:11AM | Last Updated: Dec 23 2017 12:17AM

बुकमार्क करा

वाळवा : प्रतिनिधी

नागठाणे-औदुंबर रस्त्याला असणार्‍या उसाला आज दुपारी अचानक आग लागल्यामुळे सुमारे 25 लाखाचे तर शेजारच्या द्राक्ष बागांचे 5 लाखांचे नुकसान झाले.  दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये कारखान्याला जाण्यासाठी तयार असणारा ऊस आग भडकल्यामुळे  जळून खाक झाला. यामध्ये सुनील माने, सदाशिव माने, बाळासाहेब माने, पोपट माने, महेश पाटील आदी शेतकर्‍यांचे नुकसान झाले. तर शेजारी असणार्‍या भगवान अडीसरे यांची द्राक्षबागही जळाली. सरपंच जयश्री मांगलेकर, उपसरपंच झाकीर लांडगे आदींनी भेट दिली. परिसरातील शेतकर्‍यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. मात्र वेगाने वाहणारा वारा असल्यामुळे आगीचा वणवा भडकतच गेला. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.