Sat, Feb 23, 2019 16:16होमपेज › Sangli › पत्नीसह दोघींवर खुनी हल्ला; तरूणास शिक्षा 

पत्नीसह दोघींवर खुनी हल्ला; तरूणास शिक्षा 

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 05 2018 12:32AMसांगली : वार्ताहर 

पत्नी व अन्य एका महिलेवर खुनी हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अधिक सदाशिव मोहिते ( वय 35, रा.जयसिंगपूर ) याला सात वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रूपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांनी सुनावली. सरकारपक्षातर्फे  अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिले. 

दि. 12 एप्रिल 2014 रोजी दुपारी  चांदणी चौक येथील सागर अपार्टमेंटमधील पूर्वा ब्युटी पार्लरमध्ये अधिक मोहिते गेला. पार्लरच्या मालकीण यांना भेटून आत असलेली त्याची पत्नी  अस्मिता हिला बाहेर पाठविण्यास सांगितले. पार्लरच्या  मालकीण रंजना कागी यांनी अस्मिताला पार्लरबाहेर पाठविण्यास  नकार दिला. पार्लर बंद झाल्यावर म्हणजे सायंकाळी सातनंतर भेटण्यास सांगितले. त्यामुळे अधिक संतप्‍त झाला.

अधिक  तेथून काही वेळ बाहेर गेला व येताना कोयता घेऊन आला. पार्लरमध्ये येताच  त्याने प्रथम रंजना यांच्या डोक्यावर व खांद्यावर वार केला. रंजना यांना सोडविण्यासाठी  आलेल्या अस्मितावर देखील तो वार करू लागला. दोघींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारचे लोक जमा झाले. जमाव बघून  अधिक तिथून पळून गेला.

रंजना कागी यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक मारूती चराटे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले.  न्यायालयाने अधिक मोहिते याला भा.दं.वि. कलम 307 अन्वये दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सरकारपक्षाला अधिकारी इम्रान महालकारी यांनी मदत केली.