Wed, May 22, 2019 17:12होमपेज › Sangli › सांगली : निवडणुकीच्या वादातून एकाचा खून

सांगली : निवडणुकीच्या वादातून एकाचा खून

Published On: Sep 06 2018 8:24AM | Last Updated: Sep 06 2018 8:33AMतासगाव : प्रतिनिधी

युवक राष्ट्रवादीचे तासगाव तालुकाध्यक्ष राजेश पाटील याने गावातील मातंग समाजाच्या राजेश परशराम फाळके यांच्यावर मंगळवारी रात्री खुनी हल्ला केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजेश फाळके यांचा गुरुवारी पहाटे  उपचारादरम्यान मृत्यू झाला. २०१७ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मातंग समाजाने मदत केली नसल्याच्या रागातून राजेश पाटील याने हे कृत्य केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी राजेश पाटील याने ग्रामपंचायत निवडणुकीत मातंग समाज आमच्या मागे का उभा राहीला नाही असा जाब विचारत राजेश फाळकेला लाथा - बुक्क्यांनी जबर मारहाण केली. मारहाणीत बरगड्या मोडल्याने राजेश फाळके गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बुधवारी रात्री पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. राञी उशिरा राजेश पाटील याच्या विरोधात अॅट्रॉसिटी व खूनी हल्ला केलेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. राजेश फाळके यांच्या मृत्यू नंतर राजेश पाटील याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे तासगावचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले.