Fri, Aug 23, 2019 14:55होमपेज › Sangli › कामे जमत नसतील तर राजीनामे द्या

कामे जमत नसतील तर राजीनामे द्या

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 11:44PMतासगाव : शहर प्रतिनिधी

सत्ताधारी भाजपला  जर लोकहिताची कामे जमत नसतील तर त्यांनी पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवक, नगरसेविकांनी शनिवारी झालेल्या पालिका सभेत केली. नगरपालिकेची  मासिक सभा  अवघ्या एका मिनिटांत सत्ताधार्‍यांनी गुंडाळली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी संताप व्यक्‍त केला.  नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, उपनगराध्यक्षा दीपाली पाटील, मुख्याधिकारी अभिजीत वायकोस उपस्थित होते.

सभेसमोर 12 विषय होते. यामध्ये पिण्याच्या पाण्यासंदर्भात सहा विषय होते.  अंत्यविधी अनुदान वाटप, कीटकनाशक फवारणी, बिले वाटप,  महामार्गाआड येणार्‍या पाण्याच्या पाईप लाईनमध्ये बदल असे विषय होते. अकरा वाजता राष्ट्रगीत म्हणून सभेला सुरूवात करण्यात आली. नगरसेवक व शिक्षण सभापती किशोर गायकवाड यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करावेत, अशी मागणी केली.  राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजीत माळी यांनी कमीत कमी विषयांचे वाचन तरी होऊ दे, अशी मागणी केली. यावर नगराध्यक्ष डॉ. सावंत यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर सत्तारुढ भाजपचे  पदाधिकारी व  सर्व  सदस्य सभागृहातून निघून गेले. मुख्याधिकारी वायकोस यांनी नूतन नगरसेविका सादिया शेख यांचा सत्कार केला. प्रतिभा लुगडे म्हणाल्या, प्रभाग क्रमांक 8 मध्ये पाटील वाडा ते मस्के वाडा या भागात गेल्या दोन महिन्यांपासून अस्वच्छ पाणीपुरवठा होतो आहे. पालिकेचे कर्मचारी येऊन फक्‍त पाहणी करुन गेले. मात्र अद्यापही दूषित पाणी येते. जानेवारी महिन्यात निवेदन दिले होते. पाईपलाईनही जुनीच आहे. 

नगरसेवक संतोष बेले, किशोर गायकवाड, दत्तात्रय रेंदाळकर, अभिजीत माळी, बाळासो सावंत, तानाजी पवार, वैभव भाट, नगरसेविका निर्मला पाटील, सादिया शेख, पद्मीनी जावळे, पूनम सूर्यवंशी, सुनंदा पाटील, सारिका कांबळे, मंगल मानकर आदी उपस्थित होते.

Tags : sangli, municipality monthly meeting, one minute, Close, sangli news,