Fri, Jul 19, 2019 18:17होमपेज › Sangli › मुहूर्ताच्या सौद्यात हळदीस १३,५०० रुपये दर

मुहूर्ताच्या सौद्यात हळदीस १३,५०० रुपये दर

Published On: Jan 23 2018 1:14AM | Last Updated: Jan 22 2018 11:41PMसांगली : प्रतिनिधी

सांगली मार्केट यार्डात नवीन राजापुरी हळदीच्या सौद्याचा प्रारंभ खासदार संजय पाटील यांच्या हस्ते झाला. मुहूर्ताच्या सौद्यात उत्तम रकटे (बावची, ता. वाळवा) यांच्या हळदीस प्रतिक्िंवटल 13 हजार 500 रुपये दर मिळाला. 

सांगली मार्केट यार्डात नवीन राजापुरी हळदीची आवक सुरू झाली आहे. नवीन हळदीच्या आवकेचा प्रारंभ खासदार पाटील यांच्या हस्ते झाला. सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, उपसभापती तानाजी पाटील, संचालक संतोष पाटील, प्रशांत पाटील, बाळासाहेब बंडगर, दादासाहेब कोळेकर, शीतल पाटील, सचिव पी. एस. पाटील, हळद संघटनेचे नलुभाई शहा, हळदीचे युवा व्यापारी भगवान सारडा, कौशल शहा, श्री. अट्टल, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, अडत संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, गजेंद्र कल्लोळी तसेच शेतकरी, अडते, व्यापारी उपस्थित होते. 
खासदार पाटील म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सांगली मार्केट यार्डच्या भरभराटीसाठी प्रयत्न केले जातील. 

सभापती पाटील म्हणाले, चांगला भाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी सांगली मार्केट यार्डातील सौद्यात हळद विक्रीसाठी आणावी. अद्यावत हळद व बेदाणा मार्केटसाठी बाजार समितीचा पाठपुरावा सुरू आहे.