Wed, Mar 27, 2019 04:13होमपेज › Sangli › मराठा आरक्षणासाठी खर्डा-भाकरी आंदोलन

मराठा आरक्षणासाठी खर्डा-भाकरी आंदोलन

Published On: Aug 15 2018 1:25AM | Last Updated: Aug 14 2018 11:08PMसांगली : प्रतिनिधी

मराठा स्वराज्य संघातर्फे आज मराठा आरक्षणासाठी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ खर्डा-भाकरी आंदोलन करण्यात आले. सरकारने आरक्षणाबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघाच्या पदाधिकार्‍यांनी दिला.

संघाचे अध्यक्ष महादेवराव साळुंखे म्हणाले,  सत्तेत येण्यापूर्वी भाजप सरकारने मराठा आरक्षण देणार असल्याचे सांगितले होते. पण गेल्या चार वर्षांत सरकारने चालढकल चालविली आहे. यामुळे मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. मूक मोर्चानंतर समाजाने ठोक मोर्चे काढले आहेत. सरकारने निर्णय घेतला नाही तर समाजातील तरुण नक्षलवादी बनतील.

आंदोलनात प्रदीप सव्वाशे, अधिकराव पाटील, सुभाष गायकवाड, मच्छिंद्र बाबर, बाळासाहेब जाधव,  वसंतराव चव्हाण, साहेबराव मोरे, अविराज शिंदे, रमेश शिंदे, आर. बी. पाटील, शरद पवार, सुधीर चव्हाण, शंकर सावकार, बाळासाहेब पाटील, मधुकर धुमाळ,   दत्ताभाऊ आलगीकर, शंकर मोरे, गणेश शिरदोडे, अवधूत शिंदे, सचिन रोडे, विशाल शिरदोडे यांच्यासह मराठा स्वराज्य संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.